लोणी-धामणी : पाबळ (ता. शिरूर) ते मंचर (ता. आंबेगाव) या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सर्वच लहान-मोठे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पाबळ ते मंचर रस्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर थापेवाडी घाटमाथ्यावर, लोणी ते धामणी फाटा व धामणी खिंड (ज्ञानेश्वर मंदिर) ते निरगुडसर द्रोणागिरी मळा यादरम्यान अक्षरश: रस्त्याची चाळण झालेली आहे. त्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याची तातडीने दुरुस्तीची गरज आहे.या रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बुजवावेत, अशी मागणी लोणीचे माजी सरपंच उद्धवराव लंके, बाळशीराम वाळुंज व विविध गावांच्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी केली आहे. सध्या हा रस्ता ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे विविध आजारांना निमत्रंण देत आहे. शिवाय, या रस्त्यावर अनेक लहानमोठे अपघात झाले आहेत. तेव्हा आता एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता संबंधित खात्याने त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी विविध गावांच्या नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर जागोजागी खड्डे, वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:25 AM