शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पालिकेची ५०० वाहने ठरताहेत रोडकिलर

By admin | Published: October 06, 2014 6:32 AM

शहरातील सर्व नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी शिरावर असलेल्या महापालिकेचीच हॅन्डब्रेक, लाईट, इंडिकेटर बंद असलेली ५०० पेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावत आहेत

दीपक जाधव, पुणेशहरातील सर्व नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी शिरावर असलेल्या महापालिकेचीच हॅन्डब्रेक, लाईट, इंडिकेटर बंद असलेली ५०० पेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावत आहेत. बिघाड असलेली ही वाहने बिनदिक्कतपणे शहराच्या रस्त्यावरून धावत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. महापालिकेकडून माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीतूनच ही बाब स्पष्ट झाली आहे. महापालिकेच्या कंटेनअर, कचरा गाडी, वॉटर टँकर व इतर वाहनांची धडक बसून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना शहरामध्ये नियमितपणे घडत आहेत. वाहनांची नीट देखभाल राखली जात नसल्याने या घटना वारंवार घडत असल्याने पालिकेच्या वाहनांची स्थिती कशी आहे. याबाबतची तपशीलवार माहिती लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी मिळविली आहे.महापालिकेच्या ताफ्यात कचऱ्याच्या ६४ गाड्या, ड्रेनज दुरुस्तीसाठीच्या ३५, डंपर प्लेसर १२४, अ‍ॅम्बेसिडर ५८, इंडिका ३८, जेसीबी २८ व इतर अशी १०१७ वाहने आहेत. त्यातील २१७ वाहनांचे हॅन्डब्रेक बंद आहेत; तर २७५ वाहनांचे पार्किंग लाईट, ४०९ वाहनांचे स्पिडो मीटर बंद स्थितीमध्ये आहे. तरीही ही वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावरून धावत आहेत. अनेक वाहने बंद स्थितीमध्ये आहेत. त्यातील १२ वाहने केवळ आरटीओचे पासिंग न करण्यात आल्याने बंद आहेत. गिअर बंद, स्टेअरिंग आॅईल लिकेज, हायड्रॉलिक काम, सायलेन्सर, गॅस मारते, टिपींग सिलिंडर लिकेज अशा कारणांसाठी वाहने बंद स्थितीत आहेत. शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर तळमळीने काम करणारे कार्यकर्ते अनंत ढगे याबाबत म्हणाले, ‘‘महापालिकेने वाहनांच्या स्थितीबाबत दिलेली माहिती खूपच भयानक आहे. आरटीओच्या नियमानुसार ही रस्त्यावर आणणे चुकीचे आहे. दर वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेकडून लाखो रुपयांचा निधी वाहन दुरुस्तीच्या खर्चासाठी ठेवला जातो, तो पैसा कुठे गेला. वाहनांची जर इतकी दुरवस्था असेल, तर त्या निधीचा खरंच योग्य वापर झालाय का, असा प्रश्न उभा राहतो.’’