शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

आरएसएसचे शहरात पथसंचलन

By admin | Published: October 12, 2016 1:36 AM

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत पथसंचलन करण्यात आले. बदललेल्या गणवेशातील संघाचे हे पहिलेच संचलन

पिंपरी : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत पथसंचलन करण्यात आले. बदललेल्या गणवेशातील संघाचे हे पहिलेच संचलन असल्याने स्वयंसेवक व नागरिकांमध्ये उत्सुकता होती. शहरात आज पाच ठिकाणी संघाच्या वतीने संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांचे उत्स्फू र्त स्वागत केले. देहू गटाच्या वतीने निगडी परिसरात संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यमुनानगर येथील ठाकरे मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. वाद्यवृंदाच्या तालावर स्वयांसेवकांकडून शिस्तबद्ध पद्धतीने त्रिवेणीनगर, रुपीनगर, मिलिंदनगर, राहुलनगर, आझाद चौक, साईनाथनगर, निगडी गावठाण या परिसरातून पथसंचलन करण्यात आले. साईनाथनगर आणि यमुनानगर परिसरात सचिन चिखले यांच्या वतीने स्वयंसेवकाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नगरसेविका सुलभा उबाळे, अश्विनी चिखले, शुभांगी बोऱ्हाडे यांनी ध्वजाचे औक्षण केले. राहुलनगर, मिलिंदनगर परिसरात नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुले उधळत उत्स्फूर्त स्वागत केले. मीनाताई ठाकरे मैदानावर या पथसंचलनाची सांगता करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध उद्योजक रामदास माने यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना तरुणांनी उद्योगांमध्ये उतरण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानात संघाचा वाटा उल्लेखनीय असल्याचे माने यांनी सांगितले. या पथसंचलनामध्ये निगडी, चिखली आणि देहूगाव परिसरातून सुमारे ३५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख एकनाथ पवार, अमित गोरखे यांनीही गणवेशात संचलनामध्ये सहभाग घेतला. प्रांत कार्यवाह विनायक थोरात, देहू गटप्रमुख जयंत जाधव यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. परिसर महिलाही मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या. पिंपरी परिसरात चिंचवड गटातर्फे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी, चिंचवड, काळेवाडी आणि पिंपळे सौदागर या भागातून शेकडो स्वयंसेवकांनी पथसंचलनामध्ये सहभाग नोंदविला. पिंपरी गावातील सत्यम शिवम सोसायटीपासून पथसंचलनास सुरुवात झाली. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यंदाच्या पथसंचलन आयोजनाचा मान चिंचवड गटास मिळाला. संचलनामध्ये स्वयंसेवकांकडून भारतमातेचा जयघोष केला जात होता. जमतानी कॉर्नरमार्गे अशोक थिएटर, पॉवर हाऊस चौक, गंगावा चौक या मार्गाने संचलन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला गणवेश आजच्या संचलनाचे प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमास आर. बी. कृष्णानी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. संत तुकारामनगर येथे झालेल्या संचलनामध्ये कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव परिसरामधून ३०२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. राजीव गांधी विद्यालय, नेहरुनगर, संत तुकारामनगर या भागांमधून संचलन झाले. भोसरी गटाद्वारे आयोजित केलेल्या संचलनात इंद्रायणीनगर, मोशी, आळंदी, भोसरी परिसरातून ३११ स्वयंसेवकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकुर्डी गटाच्या संचलनामध्ये वाकड, हिंजवडी, रावेत, आकुर्डी परिसरातून ३६० स्वयंसेवक नवीन गणवेशात उपस्थित होते. गंगाराम पटेल यांनी या वेळी मार्गदर्शन के ले. (प्रतिनिधी)