शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पुणे शहरातील रस्त्यांची पुन्हा चाळण होणार; रिलायन्स जीओला रस्ते खोदाईची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:17 PM

महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे.

ठळक मुद्दे१५३ किलो मिटरचे रस्ते खोदाईसाठी पालिकेच्या पथ विभागाने रिलायन्स जीओला दिली परवनागीपरवानगी मिळाल्याने खोदाईचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदारांकडून रस्ते खोदाई सुरु

पुणे : महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. सध्या मार्च अखेरमुळे निधी खर्च करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु आता रिलायन्स जीओला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिल्याने शहरातील रस्त्यांची प्रामुख्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखील चाळण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या शहरामध्ये विविध विकास कामांच्या नावाखाली वेगवेवळ्या कारणांसाठी रस्ते खोदाई, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरात कोणत्याही कारणांसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असलेली केबल टाकण्यासाठी महापालिकेकडे पारवनागी मागितली होती. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने दोन टप्प्यात रिलायन्स जीओला शहरात सुमारे १५३ किलो मिटरचे रस्ते खोदाईसाठी परवनागी दिली आहे. ही परवानगी देताना संबंधित कंपनीकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला १६९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा देखील केला आहे. यामुळे सध्या रिलायसन्स जीओ कंपनीकडून शहरात मोठ्या प्रमाणत रस्ते खोदाई सुरु आहे.महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आपल्या प्रभागासाठी मंजूर झालेला निधी मार्च अखेरपूर्वी खर्च करण्यासाठी शहरामध्ये बहुतेक सर्वच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी डांबरी रस्ता खरवडून सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. यामुळे गेल्या एक-दीड महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी सुरु आहे. यामध्ये महापालिकेच्या दोन विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने नवीन रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा केबल टाकण्यासाठी तो खोदला जातो. त्यात रिलायन्सला कायद्यानुसार परवानगी मिळाल्याने खोदाईचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदारांकडून रस्ते खोदाई सुरु आहे.रिलायन्य जीओमार्फत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येते. परंतु सध्या शहरात नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांची कामांच्या संख्याच इतकी प्रचंड आहे, की रिलायन्स कंपनीने खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला किमान एक ते दीड महिन्याचा आवधी लागत आहे. यामुळे सध्या पुणेकर नगरसेविकांची विकास कामे आणि रिलायन्स जीओची रस्ते खोदाईमुळे हैराण झाले आहेत.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे