इंदापूर : इंदापूर बसस्थानक रोडरोमिओंचा अड्डा म्हणून प्रसिद्ध आहे असे म्हणले, तरी वावगे ठरणार नाही. बसस्थानकाच्या जवळच इंदापूर महाविद्यालय आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक खेडे गावातून शेकडो मुलीं दररोज बसनेच ये - जा करीत असतात. त्यांना प्रवासात होणार त्रास मुली निमुटपणे सहन करताना दिसतात. बस स्थानकावर सहज निरीक्षण केले असता शिट्ट्या मारणे, टॉन्ट मारणे, एकटक पाहणे, असे विविध चाळे करणे, रोडरोमिओ प्रामुख्याने इंदापूरमध्ये मुलींना त्रास देण्यासाठी बुलेट गाडीचा वापर करताना दिसतात.
जोर जोरात बुलेटचा आवाज करणे, हॉर्न मोठ्याने वाजवणे, मुद्दाम बसच्या खिडकीकडे पाहून बाजूने गाडी चालवणे असे विविध प्रकार पाहण्यास मिळतात. शहरातील बसस्थानक, विद्याप्रतिष्ठान बसस्थानक, एस. बी. पाटील अभियांत्रिकीचे बसस्थानक, शहरातील बाबाचौक अशा विविध ठिकाणी रोडरोमिओंचा टोळकेच दिसते.इंदापूरमध्ये बकरी ईददिवशी घटना घडली की, एका रोडरोमिओने विद्यार्थिनीचा विनयभंग केला,अशा अनेक घटना इंदापूरमध्ये घडत आहेत. मात्र, मुली स्वत:च्या आणि घरच्यांच्या इज्जतीला घाबरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास जात नाहीत. तरी इंदापूर पोलीस ठाण्यात मागील २ महिन्यांत अनेक रोडरोमिओंवर गुन्हे दाखल झाले आहेत.बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. ‘लोकमत’ने येथील वास्तव समोर आनल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह बारामती पोलिसांनी यांची दखल घेत मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथकाची घोषणा केली. मात्र बारामतीसह जिल्ह्यात इतर तालुक्यातंही ही रोडरोमिओंची दहशत कायम आहे. ‘लोकमत’ने इंदापूर, दौैंड व राजगुरूनगर शहरात आढवा घेतला असता मुली सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. रोडरोमिओंचे शाळा, महाविद्यालये व सटी बससथनकं हे अड्डे असून तेथे सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढविण्याची गरज असल्याचे समोर आले आहे.दामिनी पथकाचा उरला नाही धाक...राजगुरुनगर : राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून येथे चार महाविद्यालये आहेत. यातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, रत्नाई महाविद्यालय व विधी महाविद्यालय ही तीन महाविद्यालये गावाबाहेरील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तर महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय हे गावात शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर आहे. यात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. मात्र त्यांच्या सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजनांचा अभाव आढळतो.महाविद्यालयाच्या आवराबाहेर रोडरोमिओंचा सुळसुळाट कायमच ‘आ’ वासून उभा असतो. विद्यार्थिनींना त्यांचा ससेमिरा चुकवत गर्दीतून वाट काढत बसस्थानाकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागते. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड रहदारीचा अडथळा. दोन-तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी प्रत्येक चौकात टवाळखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडल्याने रोडरोमिओंना पायबंद झाला होता. माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेले दामिनी पथक सुरवातीला कार्यरत होते; नंतर मात्र त्याचाही धाक राहिला नाही. गेल्या महिन्यात एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयालगतच विषप्राशन केले; मात्र दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. तसेच दावडी येथील एका विद्यार्थ्याचा धावत्या एसटीमध्ये खून करण्यात आला होता.
आमदार सुरेश गोरे यांनी यासंदर्भात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात बैठक आयोजित केली. बैठकीत उहापोह बराच झाला मात्र कृती शून्य. महाविद्यालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतदेखील अनेक सभासदांनी याबाबत चिंता व्यक्त केली मात्र परिस्थिती अजूनही जैसे थेच आहे.महाविद्यालयांच्या आवराबाहेर सीसीटीव्ही बसविणे व त्याचे फुटेज नियमितपणे पोलिसांनी तपासणे.विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय ते बसस्थानक पादचारी मार्ग बांधणे.अपेक्षित उपाययोजनाबसस्थानकात दामिनी पथकाची गस्त वाढविणे.चिंता व्यक्त केली मात्र परिस्थिती अजूनही जैसेथेच आहे.सर्व महाविद्यालायांनी चास, कडूस, पाईट, वाफगाव, दावडी, वाडा येथून स्कूल बस चालू करावी.प्रत्येक दुचाकीस्वाराच्या कागदपत्रांची कसून तपासणी करून समज देणे.दौंडला पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करायचा की मार खायचा?दौंड : शहरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला असून यामुळे महिला आणि विद्यार्थिनी त्रस्त आहेत. पोलिसांचे शाळा, महाविद्यालय या ठिकाणी गस्ती पथक सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील भीमथडी शिक्षण संस्थेजवळ शाळा सुटताना आणि भरताना दोन पोलीस गस्त घालत होते. तेव्हा एका दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुले जात असताना त्यांना हटकल्यामुळे त्यांनी गणवेशात असलेल्या एका पोलिसाला मारहाण केलीच; परंतु याव्यतिरिक्त एका मुलाच्या वडिलानेदेखील पोलिसाला मारले, ही बाब गंभीर आहे. तेव्हा पोलिसांनी महिलांचे संरक्षण करायचे की मार खायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिसांनी वेळीच जरब ठेवली असती तर ही वेळ आली नसती. गेल्या काही महिन्यांपासून रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. शहरातील सर्व शाळेजवळ रोडरोमिओंचा घोळका असतो. मुली, महिला यांना पाहताच अश्लील शब्द वापरणे, मुलींना लज्जा निर्माण होईल, असे हावभाव करणे असे प्रकार सुरू असतात. मुलींच्या संरक्षणासाठी एखादा सर्वसामान्य माणूस धावून आला तर त्या माणसाला रोडरोमिओंचा घोळका दमबाजी करतो.शैक्षणिक संस्थांच्याव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी विशेषत: सायंकाळच्या सुमारास रोडरोमिओंकडून महिलांची छेड काढली जाते. त्यामुळे महिलादेखील रोडरोमिओंमुळे हतबल झाल्या आहेत. जोरात दुचाकी गाडी पळविणे, कर्कश हॉर्न वाजविणे असे प्रकार सुरू आहेत. रोडरोमिओंवर आळा घालण्यासाठी पोलिसांसह समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच याकामी विद्यार्थिनी, महिला यांनी निर्भीड होणे गरजेचे आहे.