शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

तोतया पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:57 PM

तोतया पोलीस अधिकारी बनून आलेल्या जोडगोळीने भिगवण येथील सराफी व्यावसायिकाला हातचलाखी करीत २७ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारला.

भिगवण : तोतया पोलीस अधिकारी बनून आलेल्या जोडगोळीने भिगवण येथील सराफी व्यावसायिकाला हातचलाखी करीत २७ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास घडली. घटना घडून एक दिवस उजाडत असताना याच जोडगोळीने नीरा येथील सराफाला गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

सराफी दुकानात पोलीस अधिकारी असल्याचा अविर्भाव करीत एक जण मोठ्या ऐटीत प्रवेश करतो. काही क्षणात त्याच्या पाठीमागून त्याचा साथीदार येत ज्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कनिष्ठ कर्मचारी शॅल्युट करतात त्याप्रमाणे शॅल्युट करीत सावधानमध्ये पाठीमागे उभा राहतो. अधिकारी सराफी व्यावसायिकाला बोलबच्चन करीत सोन्याच्या वस्तू दाखविण्यास सांगत हात चलाखी करीत सोन्याच्या वस्तूवर डल्ला मारतो. सोमवारी परत पद्मावती ज्वेलर्स येथे सराफाला फसवून ९ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या चोरून पोबारा केला. या जोडगोळीने चोरीसाठी युनिकॉर्न गाडीचा वापर केला.सोमवारी ही घटना घडली असताना दुसºयाच दिवशी या जोडगोळीने नीरा येथील सराफी दुकानात हात सफाई दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी सराफाच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांचा डाव यशस्वी ठरू शकला नाही. नीरा येथे या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्नदेखील झाला, परंतु झटापटी करीत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. या बाबत सराफी व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नसल्याचे समजते. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसjewelleryदागिने