डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधीची कॅश असल्याची अफवा पोलीस तसेच आयकर विभागापर्यंत पोहचली होती. गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी त्याची खातरजमा करून तसा पंचनामाही केला होता. हे सर्व आरोपी आरे काॅलनीतील चित्रनगरीत कामगार म्हणून काम करतात. त्यातून त्यांचा एकमेकांशी संबंध आला.
असा पडला दरोडा
नथु विश्वासराव हा मावळ तालुक्यातील औंढोली येथील राहणार असून तो आरे काॅलनीत काम करतो. त्याने डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती सुनिल शेजवळ याला दिली. त्याने ही माहिती शामसुंदर शर्मा, दिनेश अहिरे यांना दिली. मुख्य सुत्रधार हेमंत कुसवाह हा आरे कॉलनीत येजा करीत असतो. त्याच्या कानावर ही माहिती पोहचली. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र, गोवा,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काही गुन्हे दाखल आहेत. त्याने दरोड्याचा कट रचला. ते सर्व जण घटनेच्या सायंकाळी रेल्वेने लोणावळ्यात आले. मध्यरात्रीनंतर भर पावसात ते डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर गेले. स्थानिकांनी त्यांना हा बंगला दाखविला. त्यानंतर खिडकीवाटे प्रवेश करून १२ जणांनी हा दरोडा टाकला. त्यांना जी माहिती मिळाली, त्यापैकी डॉक्टरांकडे केवळ ५० लाखांची रोकड मिळाली. रोकड व दागिने त्यांनी आपसात वाटून घेतले.
मंदिराला देणगी
मिळालेल्या या पैशांमधून आरोपींनी गाड्या, कपडे, मोबाईल अशी मोठी खरेदी केली आहे. काहींनी त्यांच्यावरील कर्ज भागविली. एकाने आपल्या वाट्यातून दीड लाख रुपयांची देणगी गावातील मंदिरासाठी दिली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, सहायक उपनिरीक्षक सुनिल जावळे, शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड, सचिन गायकवाड, निलेश कदम, प्रकाश वाघमारे, मुकुंद अयाचित, पोलीस अंमलदार अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, प्रमोद नवले, मुकेश कदम, अक्षय जावळे, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, विद्याधर निचीत, दत्तात्रय तांबे, अंजय मोमीन, सुभाष राऊत, गरुनाथ गायकवाड, जनार्धन शेळके, ज्ञानेश्वर क्षीरसागर, हनुमंत पासलकर, विक्रमसिंह तापकीर, सूर्यकांत वाणी, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, काशिनाथ राजापुरे, समाधान नाईकनवरे यांनी केली.