पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीतील चार जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले.
युवराज नामदेव गायकवाड (वय ३१, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर), बजरंग बलभीम गायकवाड (वय ४५), संतोष छोटू जाधव (वय ३७, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि प्रभू बाबूराव जाधव (वय ५४, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून छोटी तलवार, कटर, मिरची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला.
गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार मोहसीन शेख व उत्तम तारु यांना माहिती मिळाली की, शंकरशेठ रोडवरील एसटी अधिकारी वसाहत शेजारील रोडच्या कडेला काही जण अंधारात लपून बसले असून ते जाणाऱ्र्या येण्याऱ्र्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन तेथे जाऊन अचानक छापा घातला. तेथून ४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एक बलभीम गायकवाड हा पळून गेला. त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार संजय जाधव, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, किशोर वग्गु व इतरांनी ही कामगिरी केली.