पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मिरचीपूड, शस्त्र, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला. अमित बापू ढावरे (वय १९, रा. सहकारनगर), विनय तुळजाराम येडके (वय २०, रा. कात्रज), ऋषीकेश राजू शिंदे (वय २३, रा. सहकानगर), गणेश आनंत कातवटे (वय २१, अरण्येश्वर सहकानगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक काल पहाटे हद्दीत पेट्रोलिंग करीत होेते. त्यावेळी नवले ब्रीजजवळील कात्रज खिंडीत चौघेजण संशयास्पद उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे मिरचीपूड, शस्त्रे आढळून आली. परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून जबरी चोरी आणि दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. डिगे तपास करीत आहेत.-
--------------------------------------