लोकमत न्यूज नेटवर्क
बाभुळगाव: काटी (ता. इंदापूर) येथील इरिगेशन खात्यातील सेवा निवृृत्त जेष्ठ नागरीकाच्या घराच्या दरवाजावर मोठा दगड मारून, दरवाजा तोडुन घरात झोपलेल्या जेष्ठ नागरिक दापंत्य व त्यांच्या १५ वर्षीय नातीला धारदार कोयत्याचा धाक दाखवुन १ लाखांचा ऐवज लुटला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना सोमवारी घडली.
या प्रकरणी रत्नमाला सिताराम खरात (वय ६०, रा.काटी, ता.इंदापूर, जि.पूणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि २१) खरात या पती नातवासह काटी येथील घरात झोपल्या होत्या. रात्री १ च्या सुमारास घराचा दरवाज्यावर मोठा दगड मारून, दरवाजा तोडुन ६ अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाने नात श्रावणीच्या गळ्याला धारदार कोयता लावला व दागीने व पैसे ताबडतोब काढुन द्या नाहीतर मुलीला जीव मारून टाकण्याची धमकी दीली. तर दुसऱ्या एकाने फीर्यादी यांचे वयोवृृद्ध पती यांच्या पायाचे नडगीवर काठीने मारहाण करून घरातील रोख ४० हजार रूपये रक्कम व सोन्याचे दागीने घेवुन घराला बाहेरून कडी लावुन पळून गेले. घरातील रोख रक्कम ४० हजार रूपये, १९ हजाराचे काळे मणी असलेले लहाण गंठण, ३ हजाराचा सोन्याचा बदाम, ९ हजार ३ ग्रॅम सोन्याची फुले, ७,५०० सोन्याची नाकातील चमकी, ८ हजार ६०० चांदीची पायातील जोडवी, तीन मोबाईल असा एकुण १ लाख ७ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. तर अंगात काळे कपडे घातले होते. इंदापूर पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.