भोसरी : शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. आवश्यक रक्कम मिळविण्यासाठी अनेक एटीएम पालथी घालावी लागत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.औद्योगिक, निवासी, वाणिज्य अशी सरमिसळ असलेल्या भोसरी परिसरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.कामगार, विद्यार्थी वर्गाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परिसरातील एटीएमची संख्या मागील अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. उलट बँकांकडून तसेच एटीएम कंपन्यांकडून मशिन्सची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक एटीएम नादुरुस्त झाले आहेत. काही एटीएमचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सर्व्हर डाऊन, एर्ररमुळे बºयाचदा रोकड काढण्यात अडचणी येतात. वारंवार भेडसावणाºया या समस्यांमुळे दोन ते तीन दिवस एटीएम बंद राहतात.दुसरीकडी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे सुट्टे चलन म्हणून पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांवरील भार वाढत आहे. एटीएममध्येही याच समस्येचा सामना करावा लागतो. पाचशे व शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्याने सुट्टे चलन उपलब्ध नसल्याचे संदेश एटीएमवर दिसतात. त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढायची म्हटल्यास बँक गाठण्याखेरीज नागरिकांकडे पर्याय राहत नाही. बँक सुटीच्या कालावधीत मोठी गैरसोय होते. रक्कम मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेक एटीएम पालथी घालावी लागतात. गरजूंना तर भोसरी लगतच्या परिसरातील एटीएममध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे एटीएम सुविधेच्या मुख्य हेतूला बाधा पोहोचली असून एनी टाईम मनी (एटीएम) ऐवजी सम टाईम मनी (एसटीएम) असे फलक एटीएम केंद्रांबाहेर लावावेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी एटीएमची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्याबरोबरच सुट्या चलनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.>भोसरी परिसर : दरवाजे तुटल्याने सुरक्षा रामभरोसेशहरात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भोसरी परिसरातील एटीएमची सुरक्षा अद्याप वाºयावरच आहे. काही एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आहे. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. बँकेच्या आवारातील एटीएम वगळता अन्य ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत नाही. काही एटीएममध्ये तसेच दरवाजासमोर अक्षरश: श्वान झोपलेले पहायला मिळतात. बहुसंख्य एटीएम कचºयाचे आगार बनले आहेत. एटीएम केंद्रांची स्वच्छता केली जात नाही. याठिकाणी कचºयाचे डबे ठेवले जात नाहीत. त्यात ग्राहक व्यवहाराच्या छापील पावत्यांचा कचरा एटीएममध्येच टाकून देतात. बँक तसेच एटीएम कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
शहरातील एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:40 AM