लोणी कंद : पुणे शहरालगत असलेल्या केसनंदच्या सरपंचपदी रोहिणी जाधव तर उपसरपंचपदी सुनीता झांबरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडी जाहीर होताच फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित घोगरे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी, कामगार तलाठी लाटे यांनी सहकार्य केले.
केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायत मध्ये एकूण १५ जागांपैकी १३ जागा जिंकून ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. तर प्रतिस्पर्धी भैरवनाथ पॅनलला दोन जगा मिळाल्या. मंगळवारी खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच उपसरपंचपदाच्या निवडी झाल्या. यावेळी माजी सरपंच मिलिंदनाना हारगुडे, एस. पी. हारगुडे, तान्हाजी हारगुडे, राजेंद्र दरेकर, श्रीहरी बांगर, राजू सावंत, संतोष हारगुडे आदीनी नवनिर्वाचीत सरपंच उपसपंचांचा सत्कार केला.
फोटोओळी- केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायत निवडणूक सरपंच उपसरपंच याचा सत्कार करण्यात आला.