पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना स्वत: गाडी चालवीत नेऊन बारामतीत कार्यक्रम स्थळी नेल्यावरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात, हा संदर्भ देऊन याबाबत काही राजकीय संकेत तर नाहीत ना असे विचारले जात आहे. ‘अंबानी- अदानींना शिव्या घालणार.... हेच तर आहे साहेबांचे उद्योगविषयक धोरण’ असेही म्हटले जात आहे.
समाज माध्यमांवरील नेटकऱ्यांनी रोहीत पवारांना चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यातील काही मिम्स पुढे-
झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराथी आदमी चाहिए ‘‘गुलाम’ आता पवार कुटुंबाला महाराष्ट्रद्रोही म्हणणार का? असे एकाने म्हटले आहे.
एकीकडे अदानी-अंबानींच्या नावाने मोदींवर ताशेरे ओढायचे आणि दुसरीकडे त्याच लोकांसोबत फिरायचं. सरड्यालाही लाज वाटेल, असे एका युजरने हा फोटो टि्वट करत म्हटले आहे.
रोज अंबानी, अदानी यांचा विरोध करणारे आज अदानी यांचे सारथी अशी टीकाही केली जात आहे.
अदानीला हे विकले, अदानीला ते विकले, अदानींच्या नावाने जयघोषण केल्याने अदानींचा बारामतीमध्येरोहित पवार यांना साक्षात्कार. अदानी विकत घेण्यासाठीच येतात, तर बारामतीमध्ये पवार आता काय विकणार?
एकाने म्हटले आहे की, शेवटी रोहित पवार आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार...
बाकी कार्यकर्ते शिट्या मारण्यासाठी आहेत.