शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:45 AM

रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागल्याने धूर व आगीचे लोट निघाले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या आगीमध्ये सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या मागील बाजूस साठवलेल्या कचºयामध्ये काम करीत असलेल्या जेसीबीला आग लागल्यावर स्फोट होऊन ही आग जास्तच भडकली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

हडपसर - रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागल्याने धूर व आगीचे लोट निघाले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या आगीमध्ये सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या मागील बाजूस साठवलेल्या कचºयामध्ये काम करीत असलेल्या जेसीबीला आग लागल्यावर स्फोट होऊन ही आग जास्तच भडकली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.रामटेकडी येथे आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रोकेम कचरा प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या कचºयामध्ये एक जेसीबीचे काम चालू होते. शॉर्टसर्किटने जेसीबीने पेट घेतला. त्यानंतर जेसीबीच्या चालकाने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत जाऊन जेसीबीच्या केबिनला आग लागली. त्यानंतर डिझेल टँकला आग लागून २ स्फोट झाले. स्फोटामध्ये आग विखुरल्याने येथे असलेल्या ४५०० टन कचºयाने पेट घेतला. आग विखुरल्याने प्रकल्पातील काही यंत्रसामग्रीला आग लागली. प्रकल्पातील २ कंटेनर पेटून खाक झाले. ३५० टनावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आहे.आगीच्या ज्वाला व धुराचे लोट पसरल्याने वातावरण दूषित झाले, अग्निशामक दलाचे शिवाजी चव्हाण व त्यांचे सहकारी राजू टिळेकर, अमित शिंदे, बाबा चव्हाण, सखाराम पवार, राजाराम केदारी यांनी ४ अग्निशामक गाड्या, २ टँकर, पालिकेचे २ टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. तातडीने आग विझवल्याने कचरा प्रकल्पाच्या मशीन आगीतून वाचविण्यास अग्निशामक दलासयश आले; मात्र वाºयामुळेमोकळ्या जागेतील आग वाढतचआहे.धुराचे लोट सुरू असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुरून धुराचे लोट दिसत होते.औरंगाबाद येथील कचरा प्रश्न २१ दिवस झाले अद्यापही तो सुटला नाही. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, नवीन कचरा डंपिंग प्रकल्पास इंचभरही जागा मिळणार नाही. आज हडपसर येथील रोकेम प्रकल्पास भीषण आग लागली. नव्याने होऊ घातलेल्या ७५० टन कचरा प्रकल्पास हडपसरकर नागरिकांचा तीव्र विरोध असताना लागेबांधे जपण्यासाठी पुणे महापालिका भाजपा सत्ताधारी कचरा प्रकल्प लादत आहेत. भीषण आग म्हणजे मोठे षड्यंत्र असून याचा जाब नागरिक विचारतील.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :fireआगPuneपुणे