टाकळी हाजी : समाजातील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गांतील सनातन संघर्ष व अंधश्रद्धा विरुद्ध डोळस निष्ठा यांच्यावर भाष्य करणारा, शिक्षणाद्वारे होऊ घातलेल्या सामाजिक उत्थानाची रेशमी पहाट दाखविणाऱ्या ‘झेंडा स्वाभिमानाचा’ चित्रपटातील ‘सुमन’च्या भूमिकेने माझ्या आयुष्यातला कलाकार जागा झाला आहे. ही सुमनच आता माझ्या आयुष्यात स्वाभिमानाचा झेंडा उंचावेल, असा विश्वास प्रसिद्ध बालकलाकार तेशवानी वेताळ हिने व्यक्त केला. तिची प्रमुख भूमिका असलेला ‘घुमा’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन मिळाल्यानंतर टाकळीहाजी येथील मळगंगादेवीचे दर्शन व जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील जागतिक आविष्कार पाहण्यासाठी तेशवानी वेताळ आली होती, त्या वेळी ती बोलत होती. या वेळी आई संगीता वेताळ व अभिनेता माऊली पुराणे तिच्यासमवेत होते.
‘सुमन’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक
By admin | Published: January 25, 2017 11:49 PM