मध्यप्रदेश मधील एक कुटुंब गेल्या पाच-सहा दिवसांपासून उरुळी कांचन परिसरामध्ये फिरत असून ते ठिक ठिकाणी आपला तंबू लावून, बांबूच्या तिर कामठ्यावर दोरी बांधून त्यावरुन या ६ - ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला हवेतील तरंगत्या दोरीवर आपला तोल सांभाळून पायात चप्पल घालून चालणे, ताटली पायाखाली धरून चालणे, सायकलची रिंम पायात धरून चालणे असे वेगवेगळे प्रकार संगीताच्या ठेक्यावर सादर करायला लावून जनतेचे मनोरंजन करण्याचे काम करीत आहे व आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही पैसेजमा करीत आहेत. या कुटुंबातील हा लहान मुलगा अंदाजे वय सहा - सात वर्ष याला त्याचे आई-वडील हवेत लटकवलेल्या तरंगत्या दोरीवरून वेगवेगळ्या पद्धतीने चालण्याची कला प्रदर्शित करीत असून त्याद्वारे ते काही पैसे मिळवून आपला उदरनिर्वाह अथवा जगण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.दुर्मीळ होत चाललेली सर्कशी मधील हवेत लटवलेल्या दोरीवरुन तोल सांभाळत वेगवेगळ्या पद्धतीने चालणे , कसरत करणे हे प्रकार सध्या लोप पावत चालले आहेत.
तरंगत्या दोरीवर हवेत तोल सांभाळत वेगवेगळ्या कला सादर करताना लहानसा चिमुकला.