पितृपक्षात दानाला महत्त्व आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज गेल्या सात वर्षांपासून ‘महादान.. पुण्य महान’ ही मोहीम राबवित असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी उपक्रमाच्या प्रारंभी दिली. आर्थिक, वस्तुस्वरूपात मिळणारी मदत संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविली जाते. शहरातील निवासी संकुलांमधून रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे पदाधिकारी आणि सदस्य दात्यांकडून मिळणारी यथायोग्य मदत गरजूंपर्यंत पोहोचवितात. रविवारी स्नेह पॅरेडाईज, पौड रस्ता, कोथरुड येथे स्वाती मुळे आणि चारुता वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली ‘महादान.. पुण्य महान’ या मोहिमेला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागात ही मोहीम दि. ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. धान्य, वापरायोग्य कपडे तसेच रोख स्वरूपातही मदत स्वीकारली जाणार आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या ‘महादान.. पुण्य महान’ मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:13 AM