शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रोटी घाट झाला तुकोबामय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:46 PM

गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते.

ठळक मुद्देसाधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार

पाटस : पाटस-रोटी वळण घाटातून मजलदरमजल करीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दिड किलोमीटरचा चढतीचा घाट पार केला. यावेळी टाळ मृदंग , ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषाने अवघा घाट दुमदुमला होता.साधारणत: दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखी रोटी घाटाच्या पायथ्याशी आली. जसाजसा पालखी रथ घाटातील रस्त्यानेवर जात होता. तसतसे वारकरी भक्त टाळ मृदंगाच्या गाच्या निनादात बेफाम नाचत होते. त्यानंतर पायथ्याशी वारकरी भक्तांचा जथा एकत्रित येऊन घाटाचा चढतीचा काही भाग बेफामपणे पळत पार करीत होते. साधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार केला होता. गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. महिला वारकरी भक्तांच्या डोक्यावर तुळशाी वृंदावन तर काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. .............वरवंड (ता.दौैंड) येथील मुक्कामानंतर पालखी मजलदरमजल करीत पाटस येथे आली. यावेळी सरपंच वैैजयंता म्हस्के, उपसरपंचा आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या आशा शितोळे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. अशोक गुजर यांनी पालखी मार्गावर नयनमनोहरी रांगोळ्या काढल्या होत्या. तर परंपरेप्रमाणे दिवंगत कमलाकर देशपांडे यांच्या कुटुंबियांकडे पालखीला मानाचा नैैवेद्य होता. तर ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी होती. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि नंतर पुढे पालखीचे रोटी घाटाकडे प्रस्थान झाले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा