शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

रो हाऊस भोवले, ग्राहक मंचाचा व्यावसायिकास दणका

By admin | Published: July 07, 2015 4:34 AM

खेड-शिवापूर येथे ६ लाखांत रो हाऊस विकण्याचे आमिष दाखवून त्यातील ३ लाख रुपये घेऊनही रो-हाऊस न देऊन उलट जमिनीच्या परस्परविक्रीचा घाट घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाने फटकारले.

पुणे : खेड-शिवापूर येथे ६ लाखांत रो हाऊस विकण्याचे आमिष दाखवून त्यातील ३ लाख रुपये घेऊनही रो-हाऊस न देऊन उलट जमिनीच्या परस्परविक्रीचा घाट घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाने फटकारले. बांधकाम व्यावसायिकाने ३ लाख ३० हजार रुपये, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी १ लाख रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून १ हजार रुपये देण्याचे मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी आदेश दिले. अर्चना चेतन अंकलकोटे (रा. श्रीधरनगर साईकृपा सोसायटी, प्लॉट नं. ६१, धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली होती. कल्याणी डेव्हलपर्सचे प्राची अजय भुते, अजय गोविंद भुते व पॅरामाऊंट रिअ‍ॅलिटीजचे सचिन मुकुंद जगताप, मधुर सुरेश भोसले, साईप्रभा गोविंद मेनन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याणी डेव्हलपर्स आणि पॅरामाऊंट रिअ‍ॅलिटीज अशी बांधकाम कंपनी स्थापन करण्यात आली. त्यांनी ‘शांती होम’ नावाने रो हाऊस स्कीम जाहीर केली. अंकलकोटे यांनी ३ लाख ३० हजार रुपये दिले. बांधकाम कंपनीने रो हाऊस विकण्याच्या आमिषाने रक्कम गोळा केली; परंतु रो हाऊस बांधून दिलेच नाही. उलट, या जागेवर अर्धवट बांधकाम करून परस्पर विकण्याचा घाट घातला. यासंबंधी त्यांनी दैनिकातून जाहीर नोटीसही प्रसिद्ध केली. त्यामुळे त्यांनी ही तक्रार केली.बांधकाम कंपनीने लेखी जबाब दाखल करून तक्रारदारांचे मुद्दे नाकारले. मंचाने दोन्ही पक्षांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले. रो हाऊस खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून, रो हाऊस दिले नाही व रक्कमही परत केली नाही. यावरून निकृष्ट सेवा दिसत आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे मंचाने बांधकाम कंपनीच्या पाचही जणांनी वैयक्तिकरीत्या आणि संयुक्तरीत्या ३ लाख ३० हजार रुपये परत करावेत, तसेच नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये, तर तक्रारीचा खर्च म्हणून १ हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला.