भिगवण : आठवडेबाजारासाठी आलेल्या शेतक-याला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना मदनवाडी चौकात दुपारच्या सुमारास घडली. येथील अनधिकृत टप-यामुळे अनेक वेळा अपघात घडत असताना महामार्ग प्रशासन आणि पोलीस कारवाईबाबत उदासीन आहेत. त्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिक बोलत आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोंढारचिंचोली (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील सुरेश विश्वनाथ गलांडे (वय ५०) आठवडेबाजार करण्यासाठी भिगवणला आले होते. ते काही शेतीच्या कारणासाठी लागणाºया वस्तू खरेदीसाठी मदनवाडी चौकात गेले होते. या वेळी बारामती बाजूने भिगवण बाजूकडे येणाºया भरधाव ट्रकचालकाने (एमएच १२/ डीटी ४६३३) मदनवाडी चौकात अचानक वळण घेतल्याने गलांडे पाठीमागील चाकाखाली आले. अपघातात गलांडे यांच्या पोटावरून चाक गेल्याने जागेवरच गलांडे यांचा मृत्यू झाला. या वेळी या ठिकाणी असणाºया नागरिकांनी चालकाला पकडून भिगवण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस ठाण्यात चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे समजले. मदनवाडी चौकात अनधिकृत टपºयांमुळेच अनेक वेळा अपघात घडत असून हा अपघातही येथील गर्दीमुळे घडल्याचे नागरिक बोलत होते. अतिक्रमणामुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भिगवणला शेतक-याला चिरडले भरधाव ट्रकने, मदनवाडी चौकात दुपारच्या सुमारास घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:19 AM