मंचर : सजवलेले उंट, घोडे, झांजपथक, १५ फूट उंचीची हनुमान मूर्ती, पंजाबी व आदिवासी नृत्य यांच्या साथीत निघालेली मिरवणूक हे मंचर येथील शिवजयंती उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. मंचर शहरात शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. शहरातून शिवप्रतिमेच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.शिवराय उत्सव समितीच्या वतीने आयोजित मिरवणुकीत १५ फूट उंचीची हनुमान मूर्ती लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीत शिवरथ, सजविलेले उंट, घोडे, झांजपथक सहभागी झाले होते. पंजाबी नृत्य, आदिवासी नृत्य सादर करण्यत आले.छत्रपती शिवाजीमहाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले पथक अग्रभागी होते. लक्ष्मी रस्ता येथून मिरवणूक शिवाजीचौकात आली. तेथे मुख्य कार्यक्रम पार पडला.आंबेगाव भूषण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. मोहन साळी, उद्योजक गोविंद खिलारी, प्रशांत अभंग, डॉ. हर्षद शेटे, डॉ. नरेंद्र लोहकरे, डॉ. कैलास धायबर यांना आंबेगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी बी. डी. आढळराव पाटील, अविनाश रहाणे, सुनील गोडसे, सुनील बाणखेले, कल्पेश बाणखेले, धनेश बाणखेले, स्वप्नील बेंडे, संदीप जुन्नरे, अल्लू सय्यद, अब्दुल आतार, सोनल चासकर, सुनीता बाणखेले, खुशी बाणखेले आदी उपस्थित होते. सार्थक बाणखेले यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. घोडेगाव रस्ता, बाजारपेठ यामार्गे जात संभाजीचौकात मिरवणुकीचा समारोप झाला. धनेश बाणखेले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. अवधूत बाणखेले, अक्षय चासकर, उपेंद्र गाडे, दत्ता पिंगळे, प्रसाद साळगावकर, नीलेश गुंजाळ, संतोष जाधव, सागर ढमाले, मनोज लोंखडे, अनिकेत टेमगिर यांनी व्यवस्था पाहिली. मिरवणुकीत तरुण सहभागी झाले होते. बैलजोडी, झांजपथक अग्रभागी होते. सजविलेल्या वाहनातून शिवपुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. सुनील गोडसे, महेश थोरात, सुहास बाणखेल, कल्पेश अप्पा बाणखेले, भगवान ढेरंगे, पप्पूशेठ थोरात, भाऊ मोरड, पांडुरंग मोरडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मंचरमध्ये निघाला शाही मिरवणूक सोहळा
By admin | Published: March 17, 2017 1:42 AM