नारायणगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विघ्नहर कारखाना देशात अग्रेसर बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार सभासद व ऊस उत्पादक शेतक:यांना ऊसपीक संवर्धनास मदत व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी प्रतिटन 1क्क् रुपयांप्रमाणो रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
श्री विघ्नहर कारखान्याच्या 29व्या गळीत हंगाम प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. गळीत हंगामाची सुरुवात शुक्रवारी (दि. 17) जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील 29 हरिभक्त परायण महाराजांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमती लताबाई तांबे होत्या. याप्रसंगी सत्यशील शेरकर, भीमाजीशेठ गडगे, देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगमहाराज घुले, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, संतदास महाराज मनसुख, रामेश्वर महाराज शास्त्री, तुळशीदास महाराज सरकटे, राजाराम महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, बाळासाहेब खिलारी, दिलीपराव ढमढेरे, अतुल बेनके, तान्हाजी बेनके, शरद सोनवणो, अॅड. संजय काळे, राजश्रीताई बोरकर, तात्यासाहेब गुंजाळ, शरद लेंडे, देवराम लांडे, संभाजी तांबे, मनोज छाजेड, वैभव तांबे, संगीता वाघ, बापूसाहेब शेटे, माऊली खंडागळे, नयना डोके, जमीर कागदी, उज्ज्वला शेवाळे, शेखर को:हाळे आदी उपस्थित होते.
शेरकर म्हणाले, की या हंगामात 11 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, गेटकेनचा ऊस घेणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. अल्कोहोल निर्मितीसोबत इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. शेतक:यांचा ऊस वेळेवर तुटला आहे का, याची पाहणी करण्यासाठी भविष्यात सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. राज्यात प्रथमच आपला कारखाना इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करुन कामगारांना ऊसतोडणी स्लिप मशिनच्या माध्यमातून देणार आहोत. कारखान्याच्या कर्मचा:यांना 1क् टक्के बोनस देण्याचे शेरकर यांनी जाहीर केले. बेनके म्हणाले, ‘‘शेतक:यांचे हित जोपासणारे नेतृत्व सत्यशील शेरकर यांच्याकडे आहे.’’ शरद सोनवणो म्हणाले, ‘‘शेतक:यांच्या विकासासाठी तालुक्यातील राजकीय मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून शेरकर कुटुंबीयांना साथ द्यावी.’’ अॅड. संजय काळे, बाळासाहेब खिलारी, भीमाजीशेठ गडगे यांचीही भाषणो झाली. सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले. अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)
4विघ्नहर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय क्षेत्रतील मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, स्वाभिमान संघटनेचे नेते शरद सोनवणो, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. संजय काळे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, तसेच शिवनेरभूषण विठ्ठलबाबा मांडे आदींनी भाषण करताना सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतक:यांच्या हितासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, अशी भावना व्यक्त केली. त्यास सभासदांनी जोरदार घोषणा देऊन प्रतिसाद दिला.