लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने ३३ हजार ४७६ कांदा पिशव्यांची आवक झाली. नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १२० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला. रविवारपेक्षा कांद्याच्या भावात १०० रुपयांची मोठी घसरण झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : कांदा नं. १(गोळा) -१२० ते १५० रुपये.
सुपर कांदा १०० ते १२० रुपये.
कांदा नं. २ (कवचट): ८० ते १०० रुपये.
कांदा नं. ३ (गोल्टा): ५० ते ८० रुपये.
कांदा नं. ४ : गोलटी/ बदला- २० ते ५० रुपये.
बटाटा बाजार: गुरुवारी ओतूर उपबाजार आवारात ५०४ बटाटा पिशव्यांची आवक झाली. १० किलोस प्रतवारीनुसार ५० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला. बटाटा बाजारभाव स्थिर असल्याची माहिती ओतूर उपबाजार आवार कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.