शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

अपघातप्रकरणी ४९ लाखांची भरपाई

By admin | Published: November 17, 2016 3:26 AM

ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मेंटेनन्स मॅनेजरचा मृत्यू झाल्याप्रकरणी महालोक अदालतमध्ये तडजोडीअंती ४९ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

पुणे : ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मेंटेनन्स मॅनेजरचा मृत्यू झाल्याप्रकरणी महालोक अदालतमध्ये तडजोडीअंती ४९ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या महालोक अदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाच्या दाव्यात देण्यात आलेली ही सर्वात मोठी नुकसानभरपाई ठरली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे, अ‍ॅड. मनीषा ओस्तवाल आणि अ‍ॅड. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला आहे. सी. पी. विजयन नायर (वय ४९) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नायर हे २ एप्रिल २०१५मध्ये दुचाकीवरून कामाला चालले होते. त्या वेळी चिंचवड, शाहूनगर येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने नायर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या वेळी झालेल्या अपघातात नायर यांचा जागीच मृत्यू झाला. नायर यांच्या पश्चात पत्नी बिंदू, दोन लहान मुली असा परिवार आहे. नायर एक्स.ए.एल.टूल इंडिया या कंपनीत मेंटेनन्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा ४५ हजार ४७२ पगार होता. या पार्श्वभूमीवर ७० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बिंदू यांनी अ‍ॅड. अनिल पाटणी आणि अ‍ॅड. आशिष पाटणी यांच्यामार्फत त्या ट्रकचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी, जयपूरच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)