राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:59 AM2023-08-29T09:59:28+5:302023-08-29T09:59:50+5:30

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचे दिले संकेत

RSAP should take advantage of the split between NCP and Shiv Sena Mahadev Jankar's critical opinion | राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत

राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत

googlenewsNext

बारामती : 'राष्ट्रीय समाज पक्षाच्या कमिटीकडे बारामती, माढा आणि परभणी लोकसभा मतदार संघाची मागणी केली आहे. याबाबत कमिटिने 'ग्रीन सिग्नल'दिलेला नाही ,अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. राष्ट्रिय समाज पक्षाची जनस्वराज यात्रा सोमवारी (दि २८) रात्री बारामती शहरात पोहचली.

यावेळी जानकर यांचे 'रासप'चे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे ,तालुकाध्यक्ष अँड अमोल सातकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांची राजकीय भूमिका मांडली. जानकर म्हणाले, देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मी भेद करत नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी मित्र पक्षांचे असेच हाल केले. भाजपही सत्तेत असल्यावर असंच करणार. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षच मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनस्वराज्य यात्रा काढल्याचे जानकर म्हणाले.

 जानकर पुढे म्हणाले, 'घराणेशाही संपवून सामान्य माणूसही या देशाचा मालक झाला पाहिजे. हाच हेतू ठेवून देशात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ही यात्रा काढली आहे .मतदारांना शेतकरी, युवक, युवती यांना जागृत करून जनतेचे राज्य आलं पाहिजे. या हेतूने मागील दीड महिन्यांपासून विठ्ठलाला साकडं घालून जनस्वराज्य जनस्वराज यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत जानकर म्हणाले , 'पवार साहेब आणि सुप्रिया ताई म्हटल्या की, अजित पवार आमचे नेते आहेत. मला असं वाटतं की या दोघांचं म्हणणं एकच असेल. या दोघांच्या भांडणात लक्ष न घालता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला पाहिजे,' असे मत  जानकर यांनी व्यक्त  केलं आहे.

Web Title: RSAP should take advantage of the split between NCP and Shiv Sena Mahadev Jankar's critical opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.