लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकवल्याने महावितरणने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे गुरुवारी (दि. १५) आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.
गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज हे जनरेटरवर सुुरु असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आले नाही. गुरुवारी दुपारी जनरेटर मध्येही बिघाड झाल्याने आरटीओ कार्यालयात अंधार दाटला. त्यामुळे महावितरणने कारवाई केल्याचे लक्षात आले. आरटीओ कार्यालयाने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र थकबाकीची काही रक्कम भरल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे.
कोट
“जवळपास साडे बारा लाख रूपयांचे बिल थकले असल्याने महावितरणने ही कारवाई केली. आम्ही हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.”
-डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.