ही चाचणी करण्यासाठी नागरिकांना मांडवगण फराटा व आसपासच्या भागापासून ५० किलोमीटर अंतरावर शिरूर, कारेगाव या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी रुग्णांना जावे लागत होते. टेस्ट करण्यासाठी नागरिकांची नागरिकांचा वेळ व आर्थिक खर्चही जास्त लागत होता. कारण खासगी वाहनाने जाणे व पुन्हा येणे नागरिकांनाही परवडणारे नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार व आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांच्याकडे वेळोवेळी आरटीपीसीआर चाचणी स्थानिक ठिकाणी होण्याची मागणी केली होती.
त्यानुसार काही दिवसांपूर्वी मांडवगण फराटा गावात राव-लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून अल्पदरात अँटिजन टेस्ट केंद्र सुरू करण्यासाठी सुजाता पवार यांनी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक रुग्णाचा फायदा झाला. यावेळी सरपंच शिवाजी कदम यांनी सांगितले की, आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी प्रयत्न केल्यामुळे चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत साठी कचरा वाहतूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक घंटागाडी देण्यात आली.
या वेळी सुजाता पवार, डॉ. मंजुषा सातपुते-इसवे ,बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, गणपत फराटे, शंकर फराटे, धनंजय फराटे, शरद चकोर,बाळासाहेब फराटे, सुरेखा जगताप प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ व जिल्हा परिषदेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
.......................