शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अवयवदाता कुटुंबियांचा हाेणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 7:38 PM

रुबी हाॅल क्लिनकच्या वतीने 12 एप्रिलला अाॅर्गन डे चे अाैचित्य साधून अवयवदाता कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व पर्यंत सायंकाळी 5 वाजता अम्ब्रेला रॅलीसुद्धा काढण्यात येणार अाहे.

पुणे : 'मरावे परी अवयवरुपी उरावे'. अापल्या प्रियजनाने या जगातून निराेप घेतल्यानंतर त्याचे अस्तित्व अवयवदान करुन टिकवून ठेवणाऱ्या अवयवदाता कुटुंबियांचा सत्कार रुबी हाॅल क्लिनिक तर्फे करण्यात येणार अाहे. 12 एप्रिलला अाॅर्गन डाेनर डे चे अाैचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. त्यामध्ये या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार अाहे. तसेच अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व पर्यंत सायंकाळी 5 वाजता अम्ब्रेला रॅलीसुद्धा काढण्यात येणार अाहे. सत्काराच्या कार्यक्रमाला अभिनेते अतुल परचुरे अाणि वाहतूक उपायुक्त अशाेक माेराेळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहेत.         अवयवदानाबाबत जागरूकता वाढत असली तरी हवी तितकी जागृकता पाहायला मिळत नाही. भारतात अवयवदानाचा टक्का अनेक देशांपेक्षा खूप कमी अाहे. अमेरिकेत 1 दशलक्षमध्ये 26 टक्के, स्पेन मध्ये 1 दशलक्षमध्ये 36 टक्के अवयवदन केले जाते. त्या तुलनेत भारतात अवयवदानाचा टक्का 1 दशलक्षमध्ये फक्त 1 आहे. भारतातील ऑर्गन रिट्रीव्हल बॅकींग ऑर्गनायझेशनच्या अहवालाप्रमाणे प्रत्येक वर्षी गरजू रूग्णांना एक ते दीड लाख मुत्रपिंडांची गरज असते. मात्र फक्त 3500 ते 4000 चे प्रत्यारोपण होते. याचबरोबर प्रत्येक वर्षी 85 हजार ते एक लाख यकृतांची गरज असते.पण फक्त 5000 यकृतांचे प्रत्यारोपण होते. कॅडॅवर डोनेशन्सच्या बाबतीत रूबी हॉल क्लिनिकने अनेक कुटुंबियांमध्ये आशा निर्माण करत आपला ठसा उमटविला आहे.गेल्या वर्षी हॉस्पिटलच्या मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरला नॅशनल ऑर्गन अ‍ॅन्ड टिश्यु ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन तर्फे कॅडेवरीक ऑर्गन डोनेशनमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त झाला होता.    रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ.संजय पाठारे म्हणाले की,वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रगती झाली असली तरी जेथे वैद्यकीय व्यवस्थापन हा पर्याय राहत नाही अशा वेळी जीव वाचविण्याकरिता अवयव प्रत्यारोपण हा एकच पर्याय आहे .स्पेन, बेल्जियम व इतर पाश्‍चात्य देशांमध्ये याबद्दल जागरूकता असली तरी भारतात आपण अजून प्राथमिक टप्प्यात आहोत. मात्र अशा कार्यक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करून आपण बदल घडवू शकतो.

टॅग्स :PuneपुणेOrgan donationअवयव दान