शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
2
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
3
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
4
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

स्मार्टसिटीच्या सीईओपदावरुन रुबल अगरवाल यांना हटविले; घसरलेले मानांकन भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 2:37 AM

गेल्या काही दिवसांत स्मार्ट सिटीच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष पडले महागात

ठळक मुद्देडॉ.संजय कोलते यांच्याकडे अतिरिक्त भार

पुणे :  ‘स्मार्ट सिटीं’मध्ये मानांकन घसरलेल्या पुणेस्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल यांना हटविण्यात आले असून त्यांचा अतिरीक्त पदभार पुण्यात बदली झालेले उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्याकडे देण्यात आला आहे. घसरलेले मानांकन आणि गेल्या काही दिवसात कामाकडे झालेले दुर्लक्ष भोवल्याचे कारण पदभार काढून घेण्यामागे असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यातील काही प्रशासकीय अधिका-यांच्या राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केल्या. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निंबाळकर यांना मात्र नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. कोलते यांच्याकडे स्मार्ट सिटीचा अतिरीक्त पदभारही देण्यात आला आहे. 

पालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१६ रोजी १४ प्रकल्पांसह स्मार्ट सिटीचे पुण्यात उद्घाटन झाले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाची घसरण झाली असून केंद्र शासनाच्या ‘रँकिंग’मध्ये पुणे स्मार्ट सिटी थेट २८ क्रमांकावर गेली होती. निधीच्या विनियोगाचे न केलेले नियोजन आणि नव्या प्रकल्पांचा अभाव यामुळे हे मानांकन घसरल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीकडून माहिती अपडेट केल्यावर १५ स्थान मिळाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण - डोंबिवली आणि औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. विविध प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांना काळ्या यादी टाकण्यात आले असून काही अधिका-यांच्या नेमणुकांवरुनही वादंग झाला होता. त्यातच निधीचा विनियोग न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गेल्या पाच वर्षात मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानातून केवळ सुरुवातीच्या तीन वर्षातील ६०० कोटी रुपयांचा विनियोगच केला नाही. ४०० कोटी रुपयेच खर्च झाल्याने पुढील रक्कम मिळण्यावर मर्यादा आल्या. अशा अनेक गोष्टी अगरवाल यांच्याकडून पदभार काढून घेण्यास कारणीभूत ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ====डॉ. संजय कोलते हे मुळचे जळगावचे असून ते १९९४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी जळगाव, नाशिक, धुळे, मुंबई आणि पुण्यात काम केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीState Governmentराज्य सरकार