खरपुडी येथील खंडोबा देवाची पूजाअर्चा करून पुजारी खंडोबा पाठीमागील मंदिराकडे पूजा करण्यासाठी वन खात्याच्या जंगलातील पाऊलवाटेने जात होते. त्यावेळी त्यांना पाऊलवाटे लगत झाडाझुडांपामधे काहीतरी जमिनीत पुरले असून त्यावर काटेरी फांद्या टाकल्या आहेत. फांदयावर दगड गोटे ठेवून त्या ठिकाणी एक टोपी व नारळ ठेवला असल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. यासंदर्भात देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष सोपान गाडे, राजेश गाडे यांना कळविण्यात आले. पंरतु, नक्की काय पुरले आहे याचा उलगडा होत नव्हता काहींनी तर मृतदेह पुरल्याची चर्चा रंगली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या ठिकाणी नागरिक गर्दी सुरू झाली. ग्रामस्थांनी खेड पोलीस ठाण्यात कळवताच पोलीस हवालदार सुदाम घोडे , नवनाथ थिटे हे त्यांचा सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा मदतीने जमीन उकरली. मात्र, या खड्ड्यात कुत्र्याचा मृतदेह असल्याचे पोलीस आणि ग्रामस्थांच्या लक्षात आले.
मृतदेह पुरल्याच्या अफवेने खरपुडीत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:11 AM