पुणे : इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर येत असलेल्या निकालाच्या तारखा अनधिकृत आहेत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच या अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियावर इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत. मंडळाचे बोधचिन्ह वापरून निकालाच्या तारखा सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभुमीवर राज्य मंडळाने अद्याप निकालाच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाचे बोधचिन्ह वापरून अनधिकृतपणे निकालाच्या तारखा सोशल मिडियावर प्रसारित केल्या जात आहेत. या अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेऊ नये. निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाच्या अधिकृत ईमेलद्वारे, प्रसिध्दी माध्यमे व वर्तमानपत्रांमार्फत व मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
दहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 8:49 PM
शिक्षण मंडळाचे बोधचिन्ह वापरून निकालाच्या तारखा सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देअधिकृत तारीख अद्याप जाहीर नाही अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन