शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

By admin | Published: July 21, 2015 3:53 AM

जिल्ह्यातील जवळपास ७०४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच तालुक्यांत उमेदवारी

पुणे : जिल्ह्यातील जवळपास ७०४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच तालुक्यांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यास वेळ वाढवून देण्यात आली होती, तर काही ग्रामपंचयातींमध्ये काही उमेदवारांनी डमी अर्जही भरून ठेवले आहेत. जिल्ह्यात कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी रॅली, वाजत-गाजत मिरवणुकीतून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.---------------------------------------------------------४९ ग्रामपंचायतींसाठी २२६७ अर्ज दाखलदौंड : दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २२६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजअखेर १४१४ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कचेरीला यात्रेचे स्वरूप आले होते. तहसील कचेरीच्या परिसरात वाहने पार्किंगसाठी मोठी जागा असूनदेखील ती अपुरी पडली. तेव्हा उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात मिळेल त्या जाग्यावर वाहने पार्क केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंत होती. एकंदरीतच, उमेदवारांची गर्दी आणि परिस्थिती पाहता, दीड तासाची वेळ वाढवून दिल्यामुळे सायंकाळी साडेपाचपर्यंत आॅनलॉईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बऱ्याच उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असल्याने कागदपत्रे पूर्ण करून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. एकेका उमेदवारांनी तीन-तीन, चार-चार अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे. (वार्ताहर)-----------------------------------------------------ओतूरमध्ये ३ पॅनल, अपक्ष रिंगणातओतूर : येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ४ आॅगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ पॅनेल व अपक्ष उमेदवार यांच्यात लढती होणार आहेत. तरीदेखील खरे चित्र २३ रोजी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, श्री गजाननमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे, श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, माजी पंचायत समिती सदस्य रामदास तांबे, जय बजरंग पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष तांबे, माजी पं. स. सदस्य किसन केदार या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवनेर पॅनल रिंगणात आहे.ओतूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ६ वॉर्ड असून, एकूण १७ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मोनिका चौकातून या पॅनलच्या समर्थक व उमेदवारांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे २ हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते.ही रॅली बाजारपेठ, पानसरे आळी, पांढरी मारुती मंदिर, जुने बस स्टँड व नंतर नवीन बस स्टँडवरून परत मोनिका चौकात गेली. रॅलीत फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा यांचा गजर करत उमेदवारांना निवडून देण्याचे आशीर्वादाचे आवाहन केले जात होते. मोनिका चौकातून सर्व उमेदवार जुन्नरकडे अर्ज सादर करण्यासाठी एकत्रितपणे मिरवणुकीने गेले. या निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख म्हणून वैभव तांबे, संतोष तांबे, रामदास तांबे, किसन केदार हे काम करत असल्याची माहिती पॅनलप्रमुख संभाजी तांबे व अनिल तांबे यांनी दिली. (वार्ताहर)-----------------------------------------------------खरोशी, वाजवणे ग्रामपंचायती बिनविरोधराजगुरुनगर : शेवटच्या दिवशी विक्रमी ११२३ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार माणिकराजे निंबाळकर यांनी दिली. खरोशी आणि वाजवणे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे आज दाखल झालेल्या अर्जांवरून स्पष्ट झाले. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटच्या दिवशी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलावर उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार हे गृहीत होते. त्याप्रमाणे गर्दी झाली; पण प्रशासन सावध असल्याने काही गडबड गोंधळ झाले नाहीत. शिवाय शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरून तयार ठेवले होते. खेड तालुक्यात एकूण ८२ ग्रामापंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत. तसेच २१ गावांच्या २६ प्रभागांमध्ये पोटनिवडणुका होत असून त्यांचेही अर्ज भरले जात आहेत. निवडणुकांचे उमेदवारी अर्ज राजगुरुनगरला हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलात स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारातील नेटवर्क फ्री राहिल्याने आॅनलाइन अर्ज भरताना इतर तालुक्यांप्रमाणे अडचणी आल्या नाहीत. ----------------------------------------------------------७० ग्रामपंचायती; १३३९ अर्ज दाखलभोर : भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २०११ अर्जांची विक्री झाली, तर १३३९ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. १८ व १९ जुलैला सुट्टी होती आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी व समर्थकांनी उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी दिवसभर रांगा लावल्या होत्या. अबालवृद्धांसह महिला व तरुणांचा समावेश होता.भोर तालुक्यातील १५५ पैकी ७० ग्रामपंचायतींच्या ५०८ जागा, तर पोटनिवडणूक लागलेल्या ४८ ग्रामपंचायतींच्या ८८ अशा एकूण ५९६ जागांसाठी १३३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची दिवसभर विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यामुळे शिक्षक भवन परिसरात सायंकाळी साडेपाचपर्यंत एकच गर्दी झाली होती.

--------------------------------------------------------------

विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता. महिला तर आपल्या लहान मुलांना घेऊन अर्ज भरण्यास दिवसभर थांबून होत्या. वीसगाव खोरे, महुडे खोऱ्यासह पुणे-सातारा महामार्गावरील सर्वाधिक गावांचा समावेश असून, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्याने व भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे वगळता बहुतांशी गावांतील निवडणुका लागतील असेच वातावरण सध्यातरी पाहावयास मिळत आहे.