पुणे : तपास करणाऱ्या पोलिसांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी त्यांच्यावर टीका केली असून, खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पाहावी. रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) प्रकरणात ४ दिवसांत दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी नाव न घेता, भाजप नेता चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर टीका केली.
रूपाली चाकणकर सोमवारी पुणे पोलीस आयुक्तालय तसेच तेथील भरोसा सेलला भेट दिली. पुणे शहरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना व पुणे पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी त्या बोलत होत्या.
रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित मुलीचे अपहरण पोलिसांनी केल्याच्या आरोपाविषयी चाकणकर म्हणाल्या, या संदर्भात पीडित मुलीने शनिवारी रात्री दीड वाजता महिला आयोगाला तक्रार केली होती. सोमवारी सकाळीही तिचा ईमेल आम्हाला मिळाला. तिने केलेल्या मागणीचा अर्ज पुणे यांनी माहितीच्या पोलिसांना पाठविला आहे. तिने संपूर्ण मेडिकल तपासणीची मागणी केली आहे, तिची तपासणी केली यांनी जावी, यासाठी पोलिसांना सकाळी लवकरच पत्र पाठविले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे ईमेल केला असून, त्यात तिने संबंधित फिर्यादी आणि चित्रा वाघ या संगनमताने मीडिया ट्रायल चालवत आहे. अपमानजनक टीका करीत असून, त्यामुळे कुटुंबीयांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. त्यांच्या संगनमताची चौकशी व्हावी व त्यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी या ईमेलमध्ये केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करावी व चौकशीनंतरचा अहवाल महिला आयोगाला पाठवावा, असे आदेश पोलिसांना दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, डॉ. जालिंदर सुपेकर, उपायुक्त श्रीनिवास घाडगे व अन्या अधिकारी उपस्थित होते.
प्रज्वला योजनेचा पैसा निवडणुकीच्या प्रचारासाठी
प्रज्वला योजनेच्या पैशांबाबत आमदार मनिषा कायंदे यांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नाबाबत चाकणकर यांनी सांगितले की, मनिषा कायंदे अधिकाराखाली माहिती मागविली होती. यापूर्वीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा व त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रज्वला योजनेचा गैरफायदा घेतल्याचे आढळून आले आहे. आम्हाला जी माहिती मागितली, ती आम्ही दिली आहे.