पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असल्याने त्यांची रोजची धावपळ ठरलेली असते. पण कितीही नाही म्हटलं तरी राजकीय जबाबदारीसोबत कौटुंबिक जबाबदारी ही महत्वाची आहेच ना. त्यात आपला मुलगा जर शैक्षणिक वर्षातील दहावी किंवा बारावी सारख्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षेला सामोरे जात असेल तर निश्चितच अधिक आई म्हणून काळजी असतेच. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत कामातून वेळ काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट परीक्षा केंद्र गाठले आणि आपल्या मुलासोबतच परीक्षेला आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत शुभेच्या दिल्या.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. चाकणकर यांचा मुलगा सोहम हा बारावीला असून तो वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत शिकत आहे. पक्षाच्या व्यस्त कामातून वेळ काढून आपल्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी थेट परीक्षा केंद्र गाठले, गेटवरच मुलगा सोहम व पुतणी भक्ती ह्यांना भेटून ' बेस्ट ऑफ लक ' म्हणत त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या इतर परीक्षार्थीं मुला- मुलींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
अन् रुपाली चाकणकर यांनी केली मदत रुपाली चाकणकर ह्या परीक्षार्थींना शुभेच्छा देत असताना एका मुलीचे हॉल तिकीट घरी राहिल्याने तिला गेट मधून आत सोडण्यात येत नसल्याचे पाहून त्यांनी परीक्षा केंद्रावर विनंती करून त्या मुलीला आत सोडण्यास सांगितले. व तसेच एका व्यक्तीला तिच्या घरी पाठवून ताबडतोब हॉल तिकीट आणावयास सांगितले.