पुणे : मावळातील सोमाटने येथील एका हॉटेलच्या उदघाटन सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी (harshvardhan patil) ‘‘भाजपात गेल्याने चौकशी नाही, शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या विधानावरून कार्यक्रमात हशा पिकला. मात्र, मावळातील राजकीय वतुर्ळात या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) त्यांच्या विधानावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
''भाजपमध्ये (bjp) गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं असत्या म्हणाल्या आहेत. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे.''
काय म्हणाले होते पाटील
‘‘व्यवसाय उभारण्यासाठी आधी अभ्यास करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, छोट्या व्यवसायाकडून नंतर मोठ्या व्यवसायाकडे वळा यश नक्कीच मिळेल, असे सांगत असताना हर्षवर्धन पाटील यांनी एक विधान केल्याने कार्यक्रमात हशा पिकला. पाटील म्हणाले, ‘‘मला त्या पक्षात जावे लागले. त्यावेळी बसल्या बसल्या त्या व्यक्तीने मला विचार तुम्ही का गेलात. त्यावर मी म्हटले, तेवढं सोडून बोला. तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा हर्षवर्धन पाटील का गेला. त्यावर ते म्हणाले, ‘‘तेवढ सोडून बोला.’’ मीही त्यांना म्हटले तेवढे सोडून बोला. काय नाय मस्त आहे. निवांत आहे. शांत झोप लागते. काय नाय चौकशी नाही, काही नाही.’’