शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:08 PM

अमोल मिटकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको

पुणे : अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात  आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय. त्याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसू लागले आहेत. 

पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी पुण्यात आल्यावर मारू असा इशारा दिला होता. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देत तुमच्या बापाचं राज्य नाही असं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. हा गुन्हेगारीचा आखाडा नाही असं त्यांनी सांगितले आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, राजकारणात विकासाबद्दल बोलायला पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको. तुमची मर्दानगी तुमच्या घरी दाखवा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरावी. आंदोलन जनतेच्या विकासासाठी करा, जनतेच्या कामासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावा.

पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. राज साहेब ठाकरे पुण्यात आले. राज ठाकरेंनी आमच्या नेत्यांवर टीका केली. राज ठाकरेंनी अजित परावर टीका केल्यानंतर, राष्ट्रवादीकडून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं. राजकारणाचा दर्जा इतका खाली आलाय की, प्रत्युत्तर दिलं म्हणून डायरेक्ट हाणामारीची भाषा केली गेली. मनसेच्या लोकांनी आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली गाडी फोडल्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मनसेच्या एका कार्यकर्त्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. विचारांची लढाई झाली पाहिजे, टीका करताय तर प्रत्युत्तर सहन करायची तुमची तयारी पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणAmol Mitkariअमोल मिटकरीWomenमहिलाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस