दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभऱ्याला क्विंटलला ५८00 रुपयांचा भाव मिळाला, तर ज्वारीच्या आवकेत वाढ होऊन बाजारभाव तेजीत निघाले. पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले. मिरची, कारली, भेंडी, दोडका यांचे दर तेजीत होते. भुसार माल आणि लिंबाच्या आवकेत घट होऊन बाजारभाव तेजीत निघाले, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांची आवक स्थिर असून बाजारभाव स्थिर आहेत. तसेच मेथी, कोंथिबीर यांची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ झाली. अशी माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली. दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२५१) १६00 ते २२१४, ज्वारी (८) २४00 ते २५0१, बाजरी (४) २१00 ते २२00, हरभरा (२१) ४८४८ ते ५७१४, मका (३) १४५१ ते १४५१, लिंबू (१७) ५00-११00.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४३७) १६00 ते २४00, ज्वारी (९२७) १६00 ते २८00, बाजरी (२९) १६0१ ते २३00, हरभरा (१0५) ५५00 ते ५८00, मका (२९) १३00 ते १५00, लिंबू (७५) ७00-१८00.पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (३५) १५२५ ते २0५१, ज्वारी (७) १५00 ते २३00, बाजरी (२५) १५00 ते २४00, हरभरा (९) ५१00 ते ५१५१, मका (५) १३५१ ते १५0१. यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (६६) १६00 ते २0५१, ज्वारी (६) १८0१ ते २३00, बाजरी (१२) १६00 ते २४00, हरभरा (६) ४६00 ते ५२00, मका (४५) ९00 ते १७६0.(वार्ताहर)
हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५८०० रुपये भाव
By admin | Published: April 20, 2016 12:49 AM