Russia-Ukraine war : युक्रेनहून पुण्यात परतल्या नऊ विद्यार्थिनी; घरच्यांना पाहून विमानतळावर कोसळले रडू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:39 AM2022-02-28T11:39:57+5:302022-02-28T11:43:57+5:30

कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले आणि आपली मुली घरी आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला...

russia ukraine war nine students return to pune solapur maharashtra | Russia-Ukraine war : युक्रेनहून पुण्यात परतल्या नऊ विद्यार्थिनी; घरच्यांना पाहून विमानतळावर कोसळले रडू

Russia-Ukraine war : युक्रेनहून पुण्यात परतल्या नऊ विद्यार्थिनी; घरच्यांना पाहून विमानतळावर कोसळले रडू

Next

पुणे: युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात भारतीय दूतावासाला यश आले आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजता पुणे व सोलापूर येथील नऊ मुली लोहगाव विमानतळावर उतरल्या. त्यांना पाहून कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले आणि आपली मुली घरी आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा परत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही विद्यार्थी बॉर्डरवर आहेत. तर युक्रेनमधील विविध शहरांमध्येच अडकले आहेत. परंतु, रविवारी श्रद्धा शेटे, सुप्रिया खातकळे, रोशन गुंजाळ, अंकिता शहापुरे, सिद्धी नाईक, सुष्मिता राठोड, सलोनी गेंगाने, निधी जगताप, श्रुती लोहकरे या नऊ मुली रविवारी पुण्यात सायंकाळी ७.३० लोहगाव विमानतळावर पोहोचल्या.

त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी रोमानिया बॉर्डरवर गर्दी केली आहे. परंतु, त्यातील अनेकांचा भारतीय दूतावाशी संपर्कच झालेला नाही. मात्र संपर्क झालेल्या मुलांना सुखरूप मायदेशी आणून त्यांना घरापर्यंत पोचवले जात आहे. सिंहगड रस्ता येथे राहणारी निधी जगताप व पिंपरी चिंचवड येथील श्रुती लोहकरे घरी पोहोचल्या, तर सोलापूर येथील अंकिता शहापुरे व सोनाली गेंगाने या पुण्यातून सोलापूरकडे रात्री रवाना झाल्या आहेत. 

युक्रेनच्या बॉर्डरवर सुमारे तीन हजार विद्यार्थी अडकून पडले आहेत. अनेकांना जेवण व पिण्याचे पाणीही मिळत नाही. आम्ही थांबलेल्या ठिकाणी रशियाने गोळीबार केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मी सोलापूर येथील असून, मायदेशी परतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.

-अंकिता शहापुरे, सोलापूर

आम्ही रोमानिया बॉर्डरहून भारतात परतलो. दिल्ली येथे आल्यावर काही काळ थांबून सायंकाळी विमानाने लोहगाव विमानतळावर उतरलो. माझे कुटुंबीय माझी आतुरतेने वाट पाहत होते. एकमेकांना पाहून आम्हाला आपोआप रडू कोसळले.

-निधी जगताप, सिंहगड रस्ता, पुणे

Web Title: russia ukraine war nine students return to pune solapur maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.