शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
2
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
3
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
4
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
5
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
7
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
9
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
10
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
11
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
12
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
13
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
14
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
15
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
16
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
17
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
19
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

एक मोहीम 'आरोग्यदायी' हवेसाठी; राज्यात '#saalbhar60'चळवळीद्वारे अनेकजण एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:23 PM

लॉकडाऊनमध्ये हवा प्रदूषणमुक्त; हीच स्थिती कायम ठेवण्याची गरज

ठळक मुद्देदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंदकोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत झाली सुधारणा पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश

पुणे : लॉकडाऊनमध्ये निसर्ग प्रदूषणमुक्त झाला आहे. तो तसाच वर्षभर राहावा, यासाठी आता मोहिम सुरू झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या #saalbhar60 या डिजिटल उपक्रमामध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरातील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. प्रदूषणयुक्त हवेशिवाय आरोग्यदायी श्वास घेता यावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश सीपीसीबीच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये आहे. म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्ड्सच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये हा समावेश होतो आणि येथील वायू प्रदुषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ही मोहिम आवश्यक आहे.  

वायू प्रदुषणावर संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन (इंडिया)चे संचालक सरथ गुट्टीकुंडा म्हणाले, आपल्याला वायू प्रदुषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण ही स्रोते स्वच्छ रहावीत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे.  #saalbhar60मोहिमेबद्दल....   लॉकडाऊनच्या ६०व्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हरिद्वारमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता रिधिमा पांडे हिने या मोहिमेचा व्हिडीओ तयार केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी 'सर्वांसाठी स्वच्छ हवा' अशी मागणी करणारे फोटोज शेअर करून वर्षभर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळावी अशी ती मागणी करीत आहे. संक्षिप्त रूप :

स्रे 2.5 : २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कणस्रे10: १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण==============पुणे        लॉकडाऊनच्या ३० दिवस अगोदर     १       २       ३      ४

स्रे 2.5 : ५४.८                 २३.२     २१.३     २१.२      २१.४  स्रे10:  91.4                     37.2       34.1    33.9    35.8

===============================कोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत सुधारणा झाली. आता सर्व स्वच्छ झालंय, पण त्यावर फक्त चर्चा करून उपयोग नाही. हे स्वच्छ निसर्ग आता जपायला हवा. त्यासाठी काही हालचाल करायला हवी. म्हणून 'हॅशटॅगसालभर६०' ही मोहिम सुरू आहे. शहरी जीवनात वाहनांचे प्रदूषण वाढतेय. सार्वजनिक वाहतूकीचा वापर केला, तर प्रदूषण कमी होईल. रस्त्यांसाठी झाडं कापली जातात. पण रस्ता बांधून वाहतूक सुरळीत होत नाही. यामध्ये मुळात आपणच शाश्वत उपाय करायला हवेत. काही रस्ते मोठे हवेत. कशाला हवेत ? रस्ते मोठे की गाड्या तुंबणार नाहीत का ? याऐवजी सार्वजनिक वाहतुक वापरा आणि वैैयक्तिक वाहने रस्त्यावर कमी आणायला हवीत. सायकल वापरणे खूप चांगला उपाय आहे.  - सुजीत पटवर्धन, विश्वस्त, परिसर===========================देशात दरवर्षी पावणेदोन लाख बालकांचा मृत्यूदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅँड एन्व्हायरमेंट या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात आहे. हे मृत्यू फुप्फुसात धुलीकणांचे बारीक कण जाऊन झालेल्या संक्रमणामुळे झाले आहेत. पीएम२.५ चे कण म्हणजे आपल्या एका केसाचा जेवढा व्यास असतो, त्याच्या ५० ते ७० मायक्रोनचा कण म्हणजे पीएम२.५ होय. हे कण वाहनातील धूर, धातूचे बारीक कण, जैैविक घटकांतून येतात. हे कण श्वसन संस्थेला नुकसान पोचवतात. म्हणून वाहनांची संख्या कमी झाली तर हे कण कमी होतील. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण