पुणे : तीन वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाच हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांची शासनाने तडकाफडकी बदली केली. बारवकर यांची बदली सांगलीजिल्हाधिकारी कार्यालय भूसंपादन अधिकारी म्हणून बदली केली. बारवकर यांच्या जागेवर अद्याप अन्य अधिका-यांना नियुक्ती देण्यात आली नाही.
महसूल विभागात प्रामुख्याने क्रिम पोस्टींगसाठी अधिका-यांमध्ये प्रचंड चढाओढ होते. परंतु गेल्या काही वर्षांत असे पोस्टींग मिळविण्यासाठी मुदतपूर्वच एकमेकांना खो देण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. राजकारणी लोकांना हाताशी धरून अधिकारी प्रचंड रक्कामांची उलाढाल करून अशा क्रिम पोस्टींगसाठी प्रयत्न करतात.
हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांना या पदावर दोन वर्षांचाच कार्यकाळ झाला असून, बदलीसाठी पात्र नसताना शासनाने जुनी चौकशी उकरून काढत ते कारण दाखवत बदली केली आहे. बारवकर यांच्या बदलीमुळे मात्र महसुल विभागातील मुदतपूर्वच अधिका-यांना खो देण्याच्या प्रकाराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता हवेली प्रांत अधिकारी पदी कोण येणार यांची लोकांना उत्सुकता आहे.