कासार आंबोली ग्रामपंचायतीमध्ये एकूण १३ सदस्य असून सरपंचपदासाठी सचिन धुमाळ व उमेश सुतार या दोघांचे अर्ज आले होते. त्यामध्ये सचिन धुमाळ यांना ७ तर उमेश सुतार यांना ६ मते मिळाली. उपसरपंचपदासाठी देखील स्वप्नील शिंदे आणि शंकर सुतार या दोघांचे उमेदवारी अर्ज आले होते. त्यामध्ये स्वप्नील शिंदे यांना ७ तर शंकर सुतार यांना ६ मते मिळाली. तेव्हा उपसरपंचपदाच्या या लढतीमध्ये स्वप्नील शिंदे हे विजयी झाल्याने ते उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. पाटील व सचिव ए. आर. जगताप यांनी काम पाहिले. त्यावेळी सुवर्णा मारणे, छाया भिलारे, उमेश सुतार, स्वप्नील कांबळे, माधुरी धुमाळ, शंकर सुतार, रणजित गायकवाड, नेहा सुतार, रेश्मा गायकवाड, प्रिती शिंदे, पूजा सुतार हे सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १२पिरंगुट मुळशी
फोटो ओळ : कासार आंबोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य यांचा मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला