भूगाव : आदर्श ग्रामपंचायत भूगाव (ता. मुळशी)च्या सरपंचपदी सचिन संपत मिरघे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीचे सरपंच बाळासाहेब शेडगे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आहेत त्यांपैकी ९ सदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी मिरघे यांचा एकमेव अर्ज आला होता. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश कदम यांनी काम पाहिले, तर निवडणूक काम ग्रामसेवक एस. बी. दरेकर यांनी केले. या वेळी कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडूकाका करंजावणे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, विजूनाना सातपुते, उपसरपंच सुरेखा कांबळे, मधुकर गावडे, उमेश पवार, बाळासाहेब चोंधे, माजी उपसरपंच मनीषा शेडगे, सुजाता सांगळे, प्रमिला चोंधे, सुरेखा चोंधे, मंगल फाळके, जितेंद्र इंगवले, युवा नेते अक्षय सातपुते, राकेश कांबळे, प्रदीप शेडगे, दत्तात्रय करंजावणे उपस्थित होते.भूगाव ग्रामपंचायतीने एकाच वेळी १० कार्यालयांना आयएसओ नामांकने मिळवून संपूर्ण राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व गावाच्या विकासाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असे या वेळी मिरघे यांनी सांगितले. स्व. विजयशेठ मिरघे यांच्या रूपाने सचिन यांना सरपंच झाल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
भूगावच्या सरपंचपदी सचिन मिरघे
By admin | Published: March 31, 2017 2:22 AM