लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : भवरापूर (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन हरिभाऊ सातव यांची, तर उपसरपंचपदी वनिता विलास साठे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. मोरे यांनी दिली.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणाऱ्या सरपंच व उपसरपंच पदासाठी अनुक्रमे सचिन सातव व वनिता साठे यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. मोरे, ग्रामसेवक एस. बी. लोणकर यांनी सरपंचपदी सचिन सातव यांची तर उपसरपंचपदी वनिता साठे यांची निवड झाल्याची घोषणा निर्धारित वेळेनंतर केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या संगीता गायकवाड, जानकूबाई सातव, सदस्य नीलेश गायकवाड, मुरलीधर साठे, दत्तात्रय सातव, रमेश गायकवाड, रवींद्र साठे, विलास साठे, संदीप साठे, संतोष सातव, गणेश सातव, लक्ष्मण सातव, संजय गायकवाड, महेश गायकवाड, सुनिल गायकवाड, सारिका साठे आदी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोमनाथ चितारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो... सरपंच सचिन हरिभाऊ सातव. उपसरपंच वनिता विलास साठे.