शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र : केशव प्रथमवीर;  गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 1:12 PM

त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंग्रह करणे, साठा करणे या गोष्टी पाश्चात्य संस्कृतीत : केशव प्रथमवीरजवळपास १५ देशांमध्ये भारतीय संस्कृतीची पाळेमुळे पहायला मिळतात : अशोक कामत

पुणे : त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली. इतिहासभूषण श्री. द. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ल. का मोहरीर, गणितज्ज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. प्रथमवीर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती ही सगळ्यात जुनी संस्कृती आहे. त्यातील भारतीय संस्कृतीतील ऋग्वेद हा सगळ्यात जुना लिखित ग्रंथ आहे. म्हणजे त्याआधीही इथे भारतीय संस्कृती नांदत होती. या संस्कृतीचे त्याग हेच मूळ सूत्र आहे. संग्रह करणे, साठा करणे या गोष्टी पाश्चात्य संस्कृतीत दिसून येतात. पाश्चात्य संस्कृतीच्या या गोष्टी सध्या आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. त्याग हे मूल्य त्यामुळे हरवत चालले आहे. संस्कृतीतील हे मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर शालेय शिक्षण पद्धतीत त्याग हे मूल्य शिकवण्यावर भर द्यायला हवा.’कामत म्हणाले, ‘जगाच्या मूलस्थानी भारत होता; आजही आहे. जगात अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि लोपल्या. पण भारतीय संस्कृती आजही टिकून आहे. कारण, भारतीयांनी इतरत्र जाऊन अन्य संस्कृतीची नासधूस न करता आपली संस्कृती जोपासली. भारताबाहेरील जवळपास १५ देशांमध्ये भारतीय संस्कृतीची पाळेमुळे पहायला मिळतात. भारतीय तत्त्वज्ञान, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आचार यामुळे भारतीय जगाशी जोडला गेला. जिथे भारतीय माणूस गेला, तिथे त्याने तिथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.’कार्यक्रमात डॉ. ल. का. मोहरीर, डॉ. भालचंद्र कापरेकर आणि प्रा. मुक्ता गरसोळे यांनी श्री. द. कुलकर्णी यांच्या इतिहासविषयक खंडांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे