पुणे : पुणे महापालिका प्रकल्प विभागामार्फत कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी आजपासुन बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एकेरी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था वाहतूक पोलीसांनी उपलब्ध केली आहे. साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीत हा पुल कमकुवत झाल्याने पुणे पालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
पुणे शहर कोरेगांव पार्क व बंडगार्डन वाहतूक विभागाचे हद्दीतील वाहनांचे वाहतूकीमध्ये १० जानेवारी २०२४ ते पुढिल आदेशापर्यंत बदल करण्यात येत आहे. त्यात बंडगार्डन, कोरेगांव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत पर्णकुटी चौक ते ब्ल्यु डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. अलंकार चौक ते आय.बी. चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वर नमुद सर्व मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे.5. lकाहुन रोड जंक्शन ते तारापुर रोड जंक्शन हा रस्ता पुर्वी प्रमाणेच एकेरी मार्ग राहील. कॉन्सील हॉल चौक ते साधु वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग नगर रोडवरुन मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने :- पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यु डायमंड चौक,उजवीकडे वळण घेवून मंगलदास रोडने मोबोज चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळण घेवून आय.बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस चौक मार्गे मोर ओढा चौक
कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने :- मोर ओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क*
पुणे स्टेशन येथुन कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने :- पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळण घेवून जहाँगीर चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, पुणे स्टेशन, अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्कपुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने : पुणे स्टेशन ते अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, सरळ सर्कीट हाऊस चौक मार्गे मोरओढा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
घोरपडी व भैरोबानाला चौकामधुन येणाऱ्या सर्व बसेस (पी.एम.पी.एम.एल. सह) मोरओढा चौकाकडुन सरळ जावून काहुन रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून तारापूर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवून तारापूर रोडने ब्लु नाईल चौकाकडुन उजवीकडे वळण घेवून कॉन्सील हॉल चौकामधुन इच्छितस्थळी जातील. आय.बी. जंक्शन ते मोरओढा हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल.ब्लु डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील.