पुणे : आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आईकडे सुपुर्द केल्याचे सादियाने सांगितले. आत्मघातकी हल्ला करण्याच्या इराद्याने पुण्यातील १८ वर्षांची तरुणी काश्मीरमध्ये आल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर, सादिया व तिच्या आईने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती पत्रकारांना दिली़मी २०१५ मध्ये फेसबुकद्वारे काही तरुणांच्या संपर्कात आले़ एटीएस व मौलवींच्या मदतीने त्यातून बाहेर पडले.त्यानंतर, नर्सिंग कोर्ससाठी मैत्रिणीने काश्मीरमध्ये येण्याससांगितले. त्यामुळे मी १५ जानेवारीला तेथे प्रवेश घेतला़ तिथे २३ जानेवारीपासून बातम्या येऊ लागल्या की, पुण्यातील तरुणी २६ जानेवारीला आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता आहे़, पण २५ जानेवारीला इंटरनेट बंद झाल्याने आईशी संपर्क झाला नाही़ श्रीनगर चेकपोस्टवर जाऊन पोलिसांना मी पुण्याची सादिया शेख असल्याचे सांगितले. त्यानंतर, सर्व तपास यंत्रणांनी माझी चौकशी करून, मला सोडून दिले़ गोंधळलेल्या सादियाच्या आईने पुणे पोलिसांना सांगितले की, सादिया शिक्षणासाठी बाहेरगावी गेली होते.
आत्मघातकी बॉम्बर असल्याचे वाचून धक्काच बसला- सादिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:24 AM