शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

'आधी सुरक्षा मग परीक्षा' ; विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 11:56 PM

विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी केली सुरू

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये ‘आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा मग परीक्षा’अशी भूमिका काही अधिसभा सदस्यांनी घेतली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.परंतु,ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची आहे,त्यांना परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा होणार,असे पत्र राज्य शासनाला पाठविले.त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत.

परंतु,विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सुध्दा शासनाच्या लेखी आदेशानुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळापैकी अधिसभेत विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यातील प्रतिनिधी निवडून जातात. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मान्यता असणे गरजेची असते.त्यामुळेच परीक्षेबाबत अधिसभा सदस्यांची मते जाणून घेतली असता काही सदस्यांनी परीक्षेला स्पष्टपणे विरोध दर्शविला.सध्या विद्यार्थी आपापल्या गावी गेले असून त्यांची कौटुंबिक ,मानसिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे.तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सुमारे 3 हजार 500 गुणांची परीक्षा दिली आहे.त्यामुळे केवळ 500 गुणांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणे योग्य आहे का? असा सवालही अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला.

-------------------प्रथम विद्यार्थ्यांची सुरक्षा मगच परीक्षेचा विचार केला पाहिजे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये,विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. सध्या विद्यार्थ्यांच्या आजू-बाजूला कोरोना रूग्ण अढळून येत आहेत.तसेच पहिल्या वषार्पासून शेवटच्या वर्षापर्यंत मिळविलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी दिली जाते.पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेलच याची कोणीही खात्री देत नाही.त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा घेऊ नये.- अमित पाटील,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------------परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून सध्या आपल्या गावी गेले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शहरात बोलवल्यास त्यांचा राहण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वषार्ची परीक्षा घेऊ नये.

- अभिषेख बोके,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ------------विद्यापीठाच्या पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील किती विद्यार्थी इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर आहेत.याबाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे सुमारे 90 टक्के विद्यार्थी हे प्रवास करतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षेचा अट्टहास धरू नये.

- प्रा. के.एल.गिरमकर ,अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठ