शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

प्रवाशांची सुरक्षितता अन् बसही खिळखिळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 2:36 AM

पीएमपीसह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष : नवीन बसखरेदीकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

पुणे : बस पेटणे, चाक निखळणे, स्वयंचलित दरवाजे तुटलेले, काचा नसलेल्या खिडक्या, आसने फाटलेली, उचकटलेले पत्रे... अशा एक ना अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडत आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांची सुरक्षितताही खिळखिळी झाली आहे. याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन बसकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवून दैनंदिन प्रवास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी वारजे येथे बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्यावरून खड्ड्यात कोसळली. शिवाजीनगर येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगसमोरील उड्डाणपुलावर बस पेटल्याची घटना घडली. त्यानंतर एका बसच्या मागील चाक केवळ चार नट-बोल्टच्या आधारावर धावत असल्याचे दिसून आले. तर, शुक्रवारी डेंगळे पुलाजवळ बसचे पुढत्चे चाकच निखळले. या घटना अलीकडच्या काही दिवसांतील असून यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वारजे येथील घटनेत काही प्रवाशांना दुखापती झाल्या. प्रत्येक घटनेनंतर देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अशीच एखादी घटना घडते. अनेक वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे.

पीएमपी प्रशासनाकडून जुन्या बसकडे बोट दाखविले जाते. जोपर्यंत नवीन बस येणार नाहीत, तोपर्यंत जुन्या बस मार्गावर सोडाव्याच लागणार आहेत; अन्यथा बसचे वेळापत्रक कोलमडून जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. तसेच, भाडेतत्त्वावरील बसच्या देखभाल-दुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कारवाईही थांबविण्यात आली आहे. अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा अभाव व निष्काळजीपण यामुळे बस खिळखिळ्या होत चालल्या आहेत.आसने फाटलेली : काचा नसल्याने खिडक्या धोकादायक‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक बसमधील आसने फाटलेली दिसून आली. काही ठिकाणी बसण्यासाठी आसनच नाही. काही बसमध्ये पत्रे उचकटलेले आहेत, खिडक्यांना काचा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.काही बसमध्ये आसनांमधून खिळे बाहेर आले होते. त्यामुळे अनेक वेळा कपडे फाटल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. काही बसच्या सायलेंसरमधून धुराचे लोट निघत होते. त्याचा बसमधील प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील वाहनचालकांनीही त्रास होत होता.पैशांची चणचणदेखभाल-दुरुस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारण आहे. पीएमपीचे उत्पन्न कमी झाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाºयांचे वेतनही वेळेवर होत नाही. बसच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग घेण्यासाठी कंपन्यांची देणी वेळेवर देता येत नाहीत. त्यामुळे जुन्या साहित्यावरच काही वेळा काम करावे लागते. त्यातून ब्रेकडाऊन व अन्य घटना घडत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.ठेकेदारांवर नाही नियंत्रणपीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्यानंतरही या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. शुक्रवारी चाक निखळलेली बसही भाडेतत्त्वावरीलच होती. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण, यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. ठेकेदारांकडील बसच्या देखभाल-दुरुस्तीवर पीएमपीचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पीएमपीतील अधिकारील कबूल करतात.बसच्या काचा फुटलेल्या असतात. दरवाजेखराब आहेत. सीट चांगल्या नसतात. चालक धूम्रपान करून बसमध्येच थुंकतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.- सुभद्रा माने,प्रवासीमी दररोज बसने प्रवास करीत असल्याने खिळखिळ्या बसचा रोजचअनुभव घेतो. दुसरा पर्याय नसल्याने या बसमधून प्रवास करणे अपरिहार्य आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे.- प्रशांत चोपडे

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल