कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले, साखर कारखान्यामध्ये काम करीत असताना, कारखान्यातील सर्व सुरक्षितता नियमांचे तंतोतंत पालन करून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची, राष्ट्राची मनुष्यहानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
कार्यक्रमास कारखान्याचे वर्क्स मॅनेजर अरुण पोरे, चीफ केमिस्ट उमाकांत कांदे, चीफ इंजिनिअर सतेज पाटील, विभीषण खराडे, डेप्युटी चीफ केमिस्ट गणेश पाटील, स्टोअर किपर सुनील पवार, सहायक सिव्हिल इंजिनिअर अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी किसन कडाळे, लेबर ऑफिसर संतोषकुमार साळुंके, इलेक्ट्रिकल इंजिनिअर सचिन सुतार, कामगार युनियन अध्यक्ष मोहन काळे व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लेबर ऑफिसर संतोषकुमार साळुंके यांनी केले. तर आभार कार्यालयीन अधीक्षक शरदराव काळे यांनी केले.
फोटो ओळ : राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिनानिमित्त कर्मचारी यांना संरक्षणाबाबत मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व मान्यवर.