शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पुन्हा फडकला शिवसेनेचा भगवा

By admin | Published: May 17, 2014 5:43 AM

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी ५ लाख १२ हजार २२६ मते मिळवून विजय संपादन केला.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी ५ लाख १२ हजार २२६ मते मिळवून विजय संपादन केला. शेकापचे लक्ष्मण जगताप यांच्याशी चुरशीची लढत देऊन त्यांनी १ लाख ५७ हजार ३९७ हजारांचे मताधिक्य मिळविले. शेकापचे जगताप यांना दुसर्‍या क्रमांकाची ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली. तर १ लाख ८२ हजार २९३ मते मिळविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. मोदी फॅक्टरच्या लाटेत शिवसेनेला मावळाचा गड अभेद्य ठेवण्यात यश मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी, पुणे जिल्ह्यावर प्राबल्य, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात आमदार तरिही मावळ लोकसभेची जागा मात्र शिवसेनेच्या ताब्यात हे शल्य राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोचत होते. ही खंत केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा ही खंत व्यक्त केली होती. ही जागा खेचून आणण्याचा चंग बांधला होता. गतनिवडणुकीत शिवसेनेला शेकापचा पाठिंबा होता, या वेळी शेकापने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली असल्याने शेकापच्या उमेदवाराचेच शिवसेनेपुढे आव्हान होते. बारणे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या खासदार बाबर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून मनसेत प्रवेश केला. मनसेच्या माध्यमातून पाठिंबा म्हणून शेकापचे जगताप यांना साथ दिली. जगताप यांना साथ देणारे एकटे बाबरच नव्हते, तर त्यांचे समर्थकसुद्धा प्रतिस्पर्धी उमेदवार जगताप यांच्याबरोबर होते. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला नाही म्हणून जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारली. जगताप यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार म्हणून राष्टÑवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवले होते. पनवेलमध्ये काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर, कर्जतमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे सुरेश लाड, उरणमध्ये शेकापचे विवेक पाटील अशी घाटाखालच्या विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती, घाटाखाली शिवसेनेला मिळणारी शेकापची साथ यावेळी नव्हती, घाटावर मावळ या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपचे बाळा भेगडे ही अपवादात्मक अनुकुलता वगळता प्रतिकूल परिस्थितीत बारणे यांनी शिवसेना,भाजप,आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या माध्यमातूल शर्थीची झुंज दिली. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न न सुटल्याने राष्टÑवादी कॉंग्रेस,काँग्रेसबद्दल पिंपरी चिंचवडवासीयांच्या मनात नाराजी होती.त्यात मोदी फॅक्टरची लाट यामुळे बारणे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. (प्रतिनिधी)